विषयावरील पाच दिवसीय एफडीपीला उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (स्वायत्त संस्था) येथे नुकतीच रिसेंट ट्रेंन्डस इन एफपीजीए डिझाईन व अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट या विषयावर पाच दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम उत्साहात यशस्वीरीत्या पार पडला.
हा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ संलग्न असून संस्थेच्याआयक्यूएसी, इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिल व एम्बेडेड हब यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन डॉ. विजयकुमार पाटील, प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजक डॉ. हेमंत टी. इंगळे तर सहसंयोजक डॉ. विजय डी. चौधरी यांनी जबाबदारी सांभाळली. या एफडीपीमध्ये विविध अभियांत्रिकी महाविद्यालये, पॉलिटेक्निक संस्था तसेच उद्योग क्षेत्रातील ६५ प्रतिनिधींनी सक्रिय सहभाग नोंदवला.या कार्यक्रमासाठी किरण पाटील व्हीएएसआय टेक्निकल लिड विप्रो पुणे (व्हीएएसआय टेक्निकल लिड विप्रो पुणे ) आणि डॉ. निधी पांडा सिनियर एफपीजीए डिझाईन इंजि.एफपीजीए टेक सोल्युशन (सिनियर एफपीजीए डिझाईन इंजि.एफपीजीए टेक सोल्युशन पुणे) हे तज्ज्ञ वक्ते उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदनेने झाली. प्रस्तावना संयोजक डॉ. हेमंत टी. इंगळे यांनी सादर करून आधुनिक इलेक्ट्रॉनिक प्रणाली रचनेमध्ये एफपीजीअ तंत्रज्ञानाचे वाढते महत्त्व अधोरेखित केले. उद्घाटनपर भाषण प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी करताना उद्योगाभिमुख शिक्षण, कौशल्यविकास व नवोपक्रम यांवर भर दिला. की-नोट भाषण सहसंयोजक डॉ. विजय डी. चौधरी यांनी देत व्हीएलएसआय आणि एफपीजीए आधारित प्रणाली विकासातील उदयोन्मुख प्रवाहांवर सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे समन्वयन प्रा. महेशकुमार पाटील व प्रा. हेमराज व्ही. धांडे यांनी यशस्वीरीत्या केले.एफडीपी सत्रांदरम्यान किरण पाटील यांनी एएसआयसी व एफपीजीए मधील तांत्रिक-आर्थिक तुलना,टाईम टु मार्केटचे फायदे,व्हीवाडो टूलद्वारे वर्तवणूकीय व पोस्ट-सिंथेसिस सिम्युलेशन, डीबगिंग तंत्रे, तसेच सॉफ्ट-कोर (मायक्रोब्लेझ) आणि हार्ड-कोर (एआरएम कॉर्टेक्स) प्रोसेसरचे उपयोग स्पष्ट केले. डॉ. पांडा यांच्याकडून, व्हीएलएसआय डझनमधील डेटा-एंड (आरटीएल कोडिंग, सिम्युलेशन) आणि बॅक-एंड (ठिकाण आणि मार्ग, वेळेचे विश्लेषण), एचडीएल ची रचना, मॉड्यूल लेखन, टेस्टबेंच तयार करणे आणि बेसिक सर्किट दृश्य परीक्षण प्रत्यक्ष प्रात्यक्षिक, एंट्री बिटस्ट्रीम जनरेशनची संपूर्ण प्रक्रिया, संश्लेषण, अंमलबजावणी आणि वेळेची मर्यादा महत्त्वापर्यंत, सहभागींनी फ्लिपफ्लॉप, काउंटर, एएलयू यांच्या स्क्युअर डिजन सिम्युलेशन एसओसी आणि एमपीेएसओसी आर्किटेक्चरची, प्रोसेसिंग सिस्टम प्रोटोकॉल आणि उच्च-गती डेटा कम्युनिकेशन संकल्पना यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी सहभागींनी मिनी-प्रोजेक्ट सादर करून त्याची अंमलबजावणी व चाचणी केली. अभिप्राय सत्रात एफडीपीमुळे उद्योगाभिमुख कौशल्यविकासास मोठी चालना मिळाल्याचे सहभागी व आयोजकांनी नमूद केले. उद्घाटन व समारोप सत्राचे सूत्रसंचालन प्रा. शिरीन पिंजारी यांनी केले.या यशस्वी कार्यशाळेबद्दल डॉ. उल्हास पाटील, अध्यक्ष, डॉ. वर्षा पाटील, सचिव, डॉ. केतकी पाटील, सदस्य, डॉ. वैभव पाटील व डॉ. अनिकेत पाटील यांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले.










