पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे गुन्हा दाखल
पाचोरा ( प्रतिनिधी ) – शासनाने ठरवून दिलेल्या निकषात पात्र नसतानाही प्रशासनाची दिशाभूल करीत रेशनचे अन्नसुरक्षा योजनेतून मोफत धान्य घेऊन लाभ घेत शासनाची फसवणूक केली असल्याने पिंपळगाव हरे. च्या दोन कुटुंबातील सदस्यांविरुद्ध पुरवठा निरीक्षकांनी फिर्याद देऊन पिंपळगाव हरे पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.

सामाजिक कार्यकर्ते नीलेश नामदेव उभाळे रा. भोजे यांनी दोन वर्षापूर्वी दिलेल्या तक्रारी नुसार प्रांताधिकारी पाचोरा यांचे आदेशान्वये पाचोरा पुरवठा निरीक्षक सुषमा उरकुडे यांनी चौकशी अंती पिंपळगाव हरे येथील लाभार्थ्यांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. गुन्ह्यास पात्र असल्याने ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यातील शुभांगी व कविता यांचे विवाह झाल्यानंतर देखील मोफत धान्य घेऊन शासनाची फसवणूक केली आहे.
शंकर माधव क्षीरसागर, मुक्ताबाई शंकर क्षीरसागर, अमोल शंकर क्षीरसागर, पंडित धनु माळी, कविता शंकर क्षीरसागर तसेच प्रदीप माधव क्षीरसागर, मनीषा प्रदीप क्षीरसागर, भूषण प्रदीप क्षीरसागर, शुभांगी प्रदीप क्षीरसागर यांनी पात्र नसताना शासनाकडून मोफत धान्याचा लाभघेतला आहे. त्यामुळे या नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.









