अमळनेर ;- अमळनेरात रेशन मधील काळाबाजार रोखण्यासाठी शासकीय रेशन गोडाऊन मध्ये व स्वस्त धान्य दुकाना मध्ये CCTV कँमेरा लावने तसेच APL कार्ड धारकांना ही रेशन द्यावे अशी मागणी अमळनेर येथील देवा गृप फाऊंडेशन अमळनेर तालुका अध्यक्ष रवि पाटील यांनी केली आहे.
सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले असतांना लॉकडाऊन व संचारबंदी काळ चालु असुन आज प्रत्येक नागरिकाचा व्यवसाय बंद असुन या कोरोना संकट काळी APL कार्ड धारकांनाही रेशन देण्याची गरज असून संकटकाळी शासकीय मदत मिळावी महामारी च्या काळातही रेशनचा काळाबाजार चालु असल्याने आज या कोरोना संकटात ही अनेक गोरगरीब लोकांना रेशन पासुन वंचित आहेत.आपल्या जळगाव जिल्ह्यात जर आपण सर्वे करून महिती घेतल्यास आपल्या समोर एकच बाब समोर येईल कि अनेकांना रेशन न मिळाल्याने त्यांची घराची आज चुल पेटत नाही. बरेच लोक आज संकटात कोरोना महामारी ने नाही तर भुकबळी ने जातील. आज गोर गरीबांना फक्त शासनाचे रेशनचा आधार आहे. शासकीय रेशन मिळणे गरीबांचा हक्क असून सुद्धा गरजवंताना काळाबाजारा मुळे मिळत नाही, या कारणांमुळे या प्रकरणात लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी, प्रत्येक रेशनिंग दुकानात व शासकीय गोडाऊन मध्ये CCTV ने नजर ठेऊन गोरगरिबांचा रेशन काळाबाजारात जाण्यापासून थांबवण्यात यावे व APL कार्ड धारकांस ही रेशन उपलब्ध करून द्यावे अशी मागणी देवा गृप फाऊंडेशन अमळनेर तालुका अध्यक्ष रवि पाटील याच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन ई.मेलवर द्वारे करण्यात आले आहे .