जळगाव रेल्वे स्टेशनवर २ तास पथकाची कसून तपासणी
जळगाव (प्रतिनिधी) :- एका ट्विटर अकाउंट वरून मुंबईकडे जाणाऱ्या १२८०९ हावडा – मुंबई मेल या रेल्वे गाडीमध्ये टायमर बॉम्ब ठेवला असल्याच्या धमकीचा रेल्वे विभागाला संदेश आला. त्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाने संपूर्ण रेल्वे गाडी पथकासह श्वान पथकाकडून तपासणी करण्यात आली. परिणामी अडीच तास उशिराने गाडी पुढे जात आहे.
मुंबई हावडा मेल या गाडीमध्ये नाशिकच्या आधी मोठा बॉम्बस्फोट करण्याचा धमकीचा ट्विटर वरून संदेश आल्याने खळबळ उडाली. ट्विटर वरून आलेल्या धमकीच्या मेसेजनंतर जळगाव रेल्वे सुरक्षा बल व बॉम्बशोधक पथकाकडून जळगाव या रेल्वे स्थानकावर मुंबई हावडा रेल्वे गाडी थांबविण्यात आली. पहाटे ४. १७ मिनिटांनी जळगाव रेल्वे स्थानकावर हावडा – मुंबई मेल ही गाडी थांबवून रेल्वे सुरक्षा बल व बॉम्ब शोधक पथकाकडून गाडीतील प्रत्येक डब्बात जावून तपासणी करण्यात आली. पूर्ण रेल्वे गाडीच्या तपासणीनंतर ६ वाजून २८ मिनिटांनी रेल्वे पुढच्या प्रवासाला मार्गस्थ करण्यात आली आहे.
तब्बल २ तास १७ मिनिटे रेल्वेची पूर्ण तपासणी करण्यात आल्यानंतर गाडी पुढच्या प्रवासाला मार्गस्थ करण्यात झाली आहे. यानंतर भुसावळ जंक्शन स्थानकावर गाडी थांबवण्यात येऊन रेल्वे सुरक्षा बल व जीआरपी यांच्याकडून सुद्धा पुन्हा गाडीची तपासणी करण्यात आली. दरम्यान या माहितीला रेल्वे सुरक्षा विभागाने दुजोरा दिला आहे. याबाबत भुसावळ स्थानकाचे रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक मीना यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. त्यांनी हे सांगितले की, भुसावळ तसेच अकोला स्थानकावरही रेल्वेची तपासणी करण्यात आली असून त्यानंतरच रेल्वे पुढील मार्गाला मार्गस्थ झाली आहे.