जळगाव ते शिरसोलीदरम्यानची घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली ते जळगाव दरम्यान रेल्वेरुळावर ३२ वर्षीय तरुणाने धावत्या रेल्वेखाली येऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दि. १६ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महेंद्र आधार चौधरी (वय ३२, रा. पाण्याच्या टाकीजवळ, कढोली ता. एरंडोल) असे मयत तरुणाचे नाव आहे. गावात तो परिवारासह राहत होता.(केसीएन) बुधवारी दि. १६ एप्रिल रोजी महेंद्र हा जळगाव तालुक्यात शिरसोलीकडे गेला होता. तेथे रेल्वे रुळावर खंबा क्र. ४११/ ३-५ दरम्यान डाऊन लाईनवर एका अज्ञात रेल्वेच्या खाली आल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस स्टेशनला कळताच त्यांनी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविला. याबाबत जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.