जळगाव शहरात आशाबाबा नगर परिसरातील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या संजय श्रावण काळे (वय ५२, रा. कोठारी नगर, हरिविठ्ठल नगर) यांना धावत्या रेल्वेची धडक लागून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना दि. २१ डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास आशाबाबा नगरजवळील टॉवरसमोरील रेल्वे रुळावर घडली. ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद याप्रकरणी रामानंद नगर पोलीस करण्यात आली आहे.
शहरातील कोठारी नगरात संजय श्रावण काळे हे वास्तव्यास आहे. नेहमीप्रमाणे रविवार दि. २१ रोजी सकाळच्या सुमारास ते मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले. यावेळी आशाबाबा नगरासमोरील टॉवरसमोरील खांबा क्रमांक ४१६/२४ दरम्यान, त्यांना धावत्या रेल्वेची धडक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती रामानंद नगर पोलिसांना मिळताच पोहेकॉ अजित पाटील व नीलेश पाटील यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करुन मृतदेह तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी सीएमओ डॉ. अश्विन देवचे यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. काळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









