भुसावळ रेल्वे पोलिसांची कामगिरी
भुसावळ ( प्रतिनिधी ) – रेल्वे स्थानकावर तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांविरोधात रेल्वे सुरक्षा दलाने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन उपलब्ध’ या मोहिमेंतर्गत भुसावळ स्थानकाजवळ एका तरुणाला अटक करण्यात आली.
पोलिसांनी सापळा रचून संशयित तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे झेलम एक्सप्रेस (गाडी क्र. ११०७८) च्या आरक्षित स्लीपर श्रेणीचे तिकीट आढळून आले. चौकशी दरम्यान त्याने नाव आवेश शेख (२२, रा. रजा टॉवर चौक, भुसावळ) असल्याचे सांगितले. शेख याने संबंधित तिकीट अधिकृत दरापेक्षा ३३० रुपये अधिक घेऊन ६७० रुपयांचे तिकीट एका प्रवाशासाठी आरक्षित केल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्याच्याकडून एक हजार रुपये रोख जप्त केले.