बंगळूरू – कर्नाटक एक्सप्रेसखाली येऊन ७ ते ८ जण जागीच ठार ; १५ ते २० जखमी
पाचोरा तालुक्यातील परधाडे ते माहेजी दरम्यानची घटना
जळगाव (प्रतिनिधी) : पाचोरा तालुक्यातील रेल्वे स्टेशन परधाडे ते माहेजी दरम्यान वडगाव खुर्द गावाजवळ पुलाजवळ मोठा रेल्वे अपघात झाला असून अपघातामध्ये बंगळुरू एक्सप्रेसखाली २० ते ३० जण जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे तसेच या घटनेत ८ ते १० मयत झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
पुष्पक रेल्वेने अचानक ब्रेक मारल्याने चाकांमधून ठिणग्या उडाल्या. (केसीएन)त्यानंतर आग लागल्याची अफवा उडाल्याने रेल्वेतील प्रवाशांनी खाली उड्या मारल्या. परंतु समोरुन दुसऱ्या रेल्वे लाईनवरून येणाऱ्या बंगळुरू कर्नाटक एक्सप्रेसने या प्रवाशांना उडवले. पाचोरा तालुक्यातील रेल्वे स्टेशन परधाडे ते माहीजी दरम्यान दुसखेडा- वडगाव गावाच्या दरम्यान पूल क्रमांक ३०८२/२ जवळ हा भीषण अपघात झाला आहे. पुष्पक एक्सप्रेस ही मुंबईकडे जाणारी होती तर बेंगळुरू कर्नाटक हे रेल्वे भुसावळ कडे येत होती. त्यादरम्यान हा अपघात झाला आहे
घटनेतील जखमींना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर काही जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. घटनेमध्ये ८ ते १० जण मयत झाल्याची प्राथमिक माहिती असून जिल्हा पोलीस दल आरोग्य विभाग सतर्क झाले आहेत. या घटनेमुळे मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या जळगाव व पाचोरा दरम्यान थाबवित आल्या आहे .