पाचोरा शहरातील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) :- धावत्या रेल्वेखाली झेलम एक्स्प्रेसमधून पडून एक २० वर्षीय तरुण मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना बुधवारी दि. १६ रोजी सकाळी ८ वाजता घडली आहे. याप्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आकाशकुमार (वय २०, रा. कटनी, मध्यप्रदेश) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो झेलम एक्स्प्रेसमध्ये प्रवास करीत होता. दरम्यान, बुधवारी पाचोरा जंक्शनजवळ उड्डाणपुलाखाली अप लाईनवर खांबा क्रमांक ३७१/५/६ जवळ रेल्वे आल्यावर डब्यातून आकाशकुमार हा खाली पडला. रेल्वे पोलिसांनी त्याला पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. मयत तरुणाची पोलिसांनी ओळख पटवून नातेवाईकांना माहिती दिली आहे. याप्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.