जळगाव शहरातील बजरंग बोगद्याजवळ घटना
जळगाव प्रतिनिधी

शहरातील तांबापूरा भागात राहणाऱ्या एका प्रौढ व्यक्तीचा धावत्या रेल्वेतून पडल्याने गंभीर जखमी होवून दुदैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बजरंग बोगद्याजवळ रविवारी ४ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
सलीम चिरागोद्दीन खाटीक (वय ४५ रा. तांबापूरा, जळगाव) असे मयत झालेल्या प्रौढ व्यक्तीचे नाव आहे.त्यांच्या पश्चात आई, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. चिकन दुकान लावून ते उदरनिर्वाह करत होते. रविवारी ४ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता त्यांचा धावत्या रेल्वेतून पडल्याने गंभीर जखमी होवून जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नागरीक, मित्र परिवार आणि रेल्वे पोलीसांनी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. यावेळी रूग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. याबाबत रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.









