जळगाव ( प्रतिनिधी) – रेल्वे मालधक्का येथे दिवाळीनिमित्त विविध सामाजिक संस्थांतर्फे ४५० परिवारांना फराळ वाटप करण्यात आले.
आज सुरत रेल्वे गेट जवळील मालधक्का येथे साईबाबांची आरती करून रेल्वे माथाडी कामगार अध्यक्ष सागर सैदाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ४५० परिवारांना फराळाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी कामगार सचिव पंडित नाईक, उपाध्यक्ष राजू पटेल, माजी नगरसेवक संजय कोल्हे, श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान अध्यक्ष दीपक दाभाडे, मी मराठी प्रतिष्ठान उपाध्यक्ष राहुल परकाळे, कपिल ठाकूर, बापु ठाकरे, अतुल पवार, स्वप्नील बिर्ला, स्वप्नील परदेशी व सर्वे हुंडेकरी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी समाधान हटकर , शेरा कोळी, नितीन पाटील, राजू सपकाळे, दिनेश भालेराव, नरेंद्र सपकाळे आदींचे सहकार्य लाभले.