नंदुरबार (प्रतिनिधी ) – नंदुरबार रेल्वे स्टेशनजवळ आज दुपारी पुरी एक्स्प्रेसला आग लागल्याची घटना घडली असून आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांनाही धाव घेतली . आग आणि धुरामुळे प्रवाशांनी आरोळ्या मारल्याने एकाच गोंधळ उडाला होता . तसेच आग पाहून प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती . आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
आग लागल्यामुळे स्त्रिया आणि लहान मुले घाबरून गेली होती.आग लागल्यामुळे स्त्रिया आणि लहान मुले घाबरून गेली होती. भडकत जाणारी आग आणि त्यामुळे पसरलेल्या धुराच्या लोटामुळे काही प्रवाशांना तर श्वास घेण्यासही त्रास झाला. स्टेशन जवळ आल्याने एक्सप्रेसचा स्पीड कमी केला होता. त्यामुळे मोटरमनने प्रसंगावधान राखून एक्सप्रेस थांबवली. अग्निशमन दलाच्या जवानांनीही घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यास सुरुवात केली आहे. तसेच या एक्सप्रेसमधून प्रवाशांना तात्काळ बाहेर काढण्यात आले आहे. या आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र, आगीचं नेमकं कारण समजू शकलं नाही.