जळगाव ( प्रतिनिधी) केंद्र शासनाने खरिप हंगामाच्या तोंडावररासायनिक मिश्र खतांच्या किंमतीत आणि पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी दरवाढ केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महानगराच्यावतीने आज सकाळी पेट्रोल पंपावर वाहनधारकांना गुलाबाचे फुल देऊन अनोख्यारितीने आंदोलन करण्यात आले.तसेच जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देऊन या दरवाढीचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी पेट्रोल पंपावर लावलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला गुलाब पुष्प देण्यात आले. याप्रसंगी प्रदेश सचिव संदीप पाटील, जिल्हा सरचिटणीस अनिल खडसे, सरचिटणीस सुशील शिंदे, धवल पाटील, अमोल कोल्हे,विधानसभा क्षेत्र प्रमुख रॉकि पाटील,किशोर सूर्यवंशी,हर्षल वाघ, भूषण पवार,योगेश नरोटे,राजु शेख आदि उपस्थित होते.