रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सची खास भेट जळगावकरांना!
जळगाव (प्रतिनिधी) : सुवर्ण प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रस्तुत “द फर्स्ट लूक” हे भव्य दागिन्यांचे प्रदर्शन जळगावकरांसाठी एक अविस्मरणीय सोहळा ठरणार आहे. उद्या दिनांक २, ३ आणि ४ सप्टेंबर २०२५ रोजी काव्य रत्नावली चौकातील ओंकार लॉन्स येथे हे प्रदर्शन भरविले जात असून, दररोज सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत ते सर्वांसाठी खुले राहणार आहे.
या प्रदर्शनात ग्राहकांना दागिन्यांच्या नवनवीन व आकर्षक डिझाईन्सची दुनिया अनुभवायला मिळणार आहे. द मिनी एडिट कलेक्शन, द मेटल अँड मेटल कलेक्शन, द कलर कोड कलेक्शन, द रॉयल रिव्हायव्हल कलेक्शन आणि द फेदरलाईट कलेक्शन यांसारख्या वैशिष्ट्यपूर्ण श्रेणींचे अनावरण होणार असून, प्रत्येक कलेक्शन आपली वेगळी कहाणी सांगणार आहे. आधुनिकतेची झलक, पारंपरिकतेची उब, तसेच डिझाईनमध्ये असलेली कल्पकता यांचा सुंदर मिलाफ ग्राहकांना येथे अनुभवता येईल.
या निमित्ताने सुवर्ण दागिन्यांच्या दुनियेत एक नवा अध्याय सुरू होत असून, प्रत्येक दागिन्याच्या रूपात “कलात्मकता, नावीन्य आणि गुणवत्ता” या तीन आधारस्तंभांचे दर्शन घडणार आहे. “जळगावकरांसाठी हे प्रदर्शन केवळ खरेदीपुरते मर्यादित नसून एक वेगळा अनुभव, एक सुंदर आठवण ठरणार आहे,” असा विश्वास रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सचे पार्टनर सुशीलकुमार बाफना व सिद्धार्थ बाफना यांनी व्यक्त केला आहे.