नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) – अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना आज डिजीटल करन्सी आणणार असल्याची मोठी घोषणा केली. स्वतः रिझर्व्ह बँक ही करन्सी आणणार आहे. त्यामुळे डिजीटल करन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्याला दिलासा मिळाला आहे.
अर्थमंत्री म्हणाल्या की, सेंट्रल बँक डिजीटल करन्सीची सुरुवात करणार आहे. डिजीटल रुपी येणार आहेत. येणाऱ्या काळात सीडबीच्या विकासाला प्राधान्य देण्यात येईल. पायाभूत विकासांच्या कामासाठी खासगी गुंतवणूकदारांची मदत घेण्यात येणार आहे. ‘सेझ’चा कायदा बदलण्यात येईल. आता राज्य सरकार उद्योगामध्ये भागीदार होतील, वर्षभरात खासगी नेटवर्क प्रोव्हायडरच्या सहकार्याने 5 जी सेवा सुरू करू. भारत नेटद्वारे गावे इंटरनेटने जोडू, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
देशाच जीडीपी पुढील आर्थिक वर्षात 9.2 टक्के राहणार असल्याचे सांगून अर्थव्यवस्थेला बुस्टर मिळणार असल्याचे यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान गती शक्ती योजनेतून पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येतील. देशात 60 लाख नव्या नोकऱ्या उपलब्ध होतील. येणाऱ्या काळात रेल्वे, रस्ते, हवाई, जल वाहतुकीसाठी मोठी गुंतवणूक केली जाणार आहे. विशेषतः या बजेटमधून सामान्यांना दिलासा द्यायचा प्रयत्न असेल.