जळगाव तालुक्यातील रायपूर येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील रायपूर येथे एका २१ वर्षीय तरुणाने नैराश्यातून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दि. २६ जून रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघड झाली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरु होते.
सूर्यकांत मोहन धनगर (वय २१, रा. रायपूर ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई, वडील, बहीण, २ भाऊ यांचेसह राहत होता. सूर्यकांतचे वडील कंपनीत कामगार आहेत. तर सूर्यकांत हातमजुरी करून आयएमआर महाविद्यालयात डिप्लोमाचे शिक्षण घेत होता.(केसीएन)दरम्यान, दुपारी १ ते २ वाजेच्या सुमारास सूर्यकांतने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबीय घरी आला तेव्हा हि घटना उघड झाली.
सूर्यकांतला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला.(केसीएन)विद्यार्थ्याच्या अकाली जाण्यामुळे रायपूर गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस स्टेशनला करण्याचे काम सुरु होते.