चाळीसगाव – रयत सेनेच्या वतीने राजर्षी शाहु महाराज जयंती निमित्त पवारवाडी स्थित विठ्ठल रुख्मिणी मंदिर सभागृहात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप दि २७ रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहु महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रयत शिक्षक सेनेचे शहर अध्यक्ष सचिन नागमोती यांनी केले . याप्रसंगी प्रदेश समन्वयक पि एन पाटील,प्रदेश संघटक ज्ञानेश्वर कोल्हे ,प्रदेश सचिव प्रमोद वाघ ,रयत सेना जिल्हा अध्यक्ष संजय कापसे ,रयत शिक्षक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश चव्हाण,विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष स्पन्निल गायकवाड, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार,शहर उपाध्यक्ष प्रदीप मराठे ,दिपक देशमुख,भरत नवले,छोटु अहिरे,भूषण पाटील,श्याम पाटील,दिलीप पवार,अनिल पवार ,भावेश पगारे ,संतोष कदम,बाळु पवार ,सुनील पवार,सुभाष जाधव आदि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.