कृषी केद्र चालकावर कारवाई करण्याची रयत सेनेची मागणी

चाळीसगाव (प्रतिनिधी) – तालुक्यात शंभर टक्के पेरणी झाली असून गेल्या दोन दिवसांपासून पाऊस चांगला झाल्याने पिकांची वाढ होण्यासाठी युरीया खंताची गरज असल्याने तालुक्यातील शेतकरी खत विक्रेत्यांकडे खते घेण्यास जात आहेत.
मात्र दुकानदार खते देण्यास त्यांची अडवणूक करून युरीया खत पाहिजे असल्यास मिश्र खते घेण्यास बंधनकारक करीत असल्याचे शेतकऱ्यांनी रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार,प्रदेश अध्यक्ष संतोष निकुंभ यांना सांगिल्याने दि २३ रोजी चाळीसगाव तालुका कृषी अधिकारी साठे व पंचायत समिती कृषी अधिकारी भालेराव यांना निवेदन देवून खत विक्रेत्यांचा स्टॉक तपासणी करण्याची मागणी लावून धरल्याने तालुका कृषी अधिकारी साठे व पंचायत समिती कृषी अधिकारी भालेराव तसेच रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार,प्रदेश अध्यक्ष संता पैलवान यांनी घाट रोड वरील सुप्रसिद्ध कृषी केंद्र येथे जाऊन खत उपलब्ध आहेत का अशी विचारणा केली असता कृषी केंद्र चालकाने खत उपलब्ध असल्याचे सांगितल्याने कृषी अधिकारी साठे व भालेराव यांनी त्यांना सांगितले की प्रति बॅग युरीया २६६ रुपये दराने शेतकऱ्यांना खत देणे बंधनकारक असताना तुम्ही प्रति बॅग ३०० रुपये दराने विक्री करत असल्याचे सांगताच त्यांनी देखील कबूल केले की हो आम्ही युरीया प्रती बॅग ३०० रुपयांनी विक्री करत असल्याचे सांगितल्याने कृषी अधिकाऱ्यांना देखील कळाले की काही कृषी केंद्र चालक शेतकऱ्यांची लुट करून मिश्र खते शेतकऱ्यांच्या माथी मारत असल्याचे निर्देशनास आल्याने कृषी केंद्र चालकावर कारवाई करण्याची मागणी रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार , प्रदेश अध्यक्ष संतोष निकुंभ ( संता पैलवान) यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे केल्याने कृषी अधिकारी साठे व भालेराव यांनी घाट रोड येथील सुप्रसिद्ध कृषी केंद्र चालकावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे .याप्रसंगी तालुका उपाध्यक्ष दत्तू पवार, शहर उपाध्यक्ष प्रदीप मराठे, दिलीप पवार, जयेश पाटील, उत्कर्ष शिंदे, नितीन माळे ,मनोज कापसे ,शुभम पावले ,महेश जाधव, गोकुळ पावले, शाम चव्हाण, पवन निकुंभ, विशाल देशमुख, भूषण पाटील, अक्षय कापसे अदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







