रावेर (प्रतिनिधी) : “माझी लाडकी बहीण योजना” ही गरजू महिलांच्या घर संसाराला हातभार लावणारी योजनेची सुरुवात होऊ घातलेल्या रक्षाबंधननिमित्त होत आहे. सरकारने दिलेले आश्वासांना सांभाळत लाडकी बहीण योजनेचे ३ हजार रुपये बहिणीच्या खात्यामध्ये जमा झाले असल्याने उप मुख्यमंत्री देवेन्द्र फडणिस यांचे व सरकारचे आभार मानण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात भाजपाचे नंदकिशोर महाजन, लोकसभा निवडणूक प्रमुख यांनी सर्व बहिणींना योजनेसंदर्भात मार्गदर्शन केले. रंजनाताई पाटील, अमोल जावळे, पद्माकर महाजन, सुरेश धनके यांचे मार्गदर्शपर भाषणे झालीत. यावेळी तालुक्यात असलेल्या वेगवेगळया बचत गटांच्या महिलांचा मान्यवराच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सावदा येथील भजनी मंडळाने आपल्या सुमधुर आवाजात उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी तालुक्यातील सर्वच गावांतील महिला हजर होत्या तसेच केतकीताई पाटील, रावेर तालुका भाजपा अध्यक्ष महेश चौधरी, दुर्गादास पाटील, हरलाल कोळी, योगेश बोरोले, नितिन पाटील, दिलीप भारंबे, लक्ष्मण पाटील यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.