रावेर (प्रतिनिधी) – रावेर शहरातील बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी ११ हजाराची रोकड चोरल्याची घटनाघडली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रावेर शहरातील जुना सावदा रोडवर असलेले माऊली नगर येथील भरत सुरेश पाटील (वय-३०) हे आपल्या परिवारसह राहायला आहे. ७ डिसेंबर रोजी त्यांचे घर बंद असतांना मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरातून ११ हजाराची रोकड चोरली. हा प्रकार गुरूवार ८ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीला आला. याप्रकरणी रावेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी विष्णू भील करीत आहे.