मृतदेह भारतात आणण्यासाठी कुटुंबीयांची प्रशासनाकडे विनंती
रावेर(प्रतिनिधी):- रोजगार मिळविण्यासाठी एका कंपनीत स्विझर्लंड येथे गेलेल्या खिरवळ ता. रावेर येथिल रहिवासी तरुणाने राहत्या खोलीत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
गोकुल सुकलाल गाढे (वय ४४, खिरवळ ता रावेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. अतिशय गरिबीची परिस्थती असलेला गोकुळ सुकलाल गाढे हा ओव्हासिस इंव्हेसमेंड प्रा लि या तेल कंपनीमध्ये रोजगार निमित्त स्विझर्लंड येथे गेला होता. (केसीएन)त्याला जाऊन तीन महीने झाले होते.कंपनी जवळ असलेल्या त्याच्या राहत्या खोलीत त्याने आत्महत्या केली आहे.
याबाबत त्याचा मृतदेह भारतात त्याच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यासाठी आणण्यासाठी प्रशासनाने आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी मदत करावी अशी अपेक्षा गाढे कुटुंब यांनी केली आहे. मयत गोकुळ गाढे यांच्या पश्चात दोन मुल, एक मुलगी, पत्नी लक्ष्मी,भाऊ महेंद्र गाढे, गोकुल तायडे आदी परिवार असुन मृतदेह स्विझर्लंड येथून खिरवळ ता. रावेर) येथे आणण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी मदत करण्याचे कुटुंबीयांनी आवाहन केले आहे.