लहान बालकाला केले जखमी
रावेर (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून रावेर शहर आणि परिसरात पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून, लहान बालकांना धोका निर्माण झाला आहे. दोन दिवसांपूर्वी एका पिसाळलेल्या कुत्र्याने ८ बालकांना चावा घेऊन जखमी केले आहे. अवघ्या दोन वर्षाच्या मुलाच्या तोंडाला जबर चावा घेऊन जखमी केल्याने, त्याला पुढील उपचारार्थ जळगाव येथिल सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यशवंत माळवे असे या मुलाचे नाव आहे. दरम्यान या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून २० ते २५ कुत्र्यांचे टोळके जुना सावदा रोड व रावेर शहरात फिरत आहेत. एक दिवसापुर्वी दोन वर्षीय मुलाच्या दोन्ही गालांना व तोंडाला चावुन जबर जखमी केल्यानंतर अजून ७ लोकांना चावा घेतला आहे. शेख रसीद शेख आसिफ (वय १२), समर्थ करतार जाधव (वय १०), आस्मिन खान (वय ६), रेहान फारूख खाटीक (वय १६), शेख हसन शेख अजहर (वय ४.५), अथर्व पुर्ण नाव माहीत नाही (वय ६) माही दिलिप विंचुरकर (वय ४.५) हे ८ बालक व नितिन बालचंद महाजन (वय ३४) अलताफ शेख गफार (वय ३५) आनंद दत्तात्रय वाणी (वय ५o) आदि (सर्व रा. जुना सावदारोड, सौभाग्य नगर, रावेर)स्वामी शाळा परिसरात कुत्र्यांनी चावा घेतला होता. बाकी जखमींवर ग्रामिण रुग्णालयात उपचार करण्यात आले. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.