रावेर ( प्रतिनिधी ) – तडवी कॉलनीतून अज्ञात चोरट्याने मध्यरात्री घरातल्या कपाटातील ६७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीला आली. रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुस्ताक रसुल तडवी (वय-५५) हे खाजगी नोकरीला आहेत. २४ सप्टेंबर रोजी रात्री ११ ते २५ सप्टेंबर रोजी सकाळी ५ वाजेच्या दरम्यान सगळे जण घरात झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने घरात शिरून घरातील लोखंडी कपाटातील सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण ६७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले. मुस्ताक रसुल तडवी यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो ना सुरेश मेढे करीत आहे.







