रावेर ( प्रतिनिधी ) – कोल्हापूर येथे राज्यस्तरीय सब ज्यूनियर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 17 ते 20 नोव्हेंबर दरम्यान होणार आहेत . या स्पर्धेसाठी आज सरदार जी. जी. स्पोर्ट्स क्लब व महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती 14 व 17 वर्ष वयोगटांत खेळाडूंची निवड करण्यात आली.
अध्यक्षस्थानी रावेर शिक्षण संवर्धक संघाचे चेअरमन प्रकाश मुजूमदार होते. उद्घाटन उपाध्यक्ष अशोक वाणी यांनी केले. शितल वाणी , संतोष अग्रवाल, विकास देशमुख, प्रकाश जोशी , अंबिका व्यायाम शाळेचे अध्यक्ष भास्कर पहेलवान, सरदार जी जी हायस्कूलचे मुख्याध्यापक शिरीष वाणी , कमलाबाई गर्ल्स हायस्कूलचे मुख्याध्यापक जयंत कुलकर्णी , उपमुख्याध्यापक टी.व्ही महाजन , पर्यवेक्षक ई.जे. महाजन , एस पी पाटील उपस्थित होते यांची प्रमुख उपस्थिती होती प्रकाश मुजुमदार व अशोक वाणी यांच्या हस्ते क्रिकेट ग्राऊंडचे पूजन करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.
या निवड चाचणीच्या यशस्वीतेसाठी .जे.के. पाटील, युवराज माळी , अजय महाजन , प्रतिक खराले, हेमंत देव, जयेश बिरपन , दीपक जाधव व सरदार जी जी स्पोर्ट्स क्लबच्या सर्व खेळाडूंचे सहकार्य लाभले . राज्य टेनिस बॉल असोसिएशनचे सचिव वासेफ पटेल यांनी खेळाडूंना क्रिकेटबद्दल माहिती दिली निवड चाचणीसाठी साजिद तडवी व प्रतिक खराले यांनी काम पाहिले. निवड झालेले खेळाडू जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व कोल्हापूर येथे राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत करणार आहेत.