वंचित बहुजन आघाडीचे पोलिसांना निवेदन
चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) :- रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस स्टेशनला वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने निंभोरा पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. रावेर तालुक्यातील ऐनपुर, खिर्डी, तांदलवाडी या गावातील सट्टा, पत्त्यांचे अड्डे, देशी दारू, हातभट्टी या सर्व अवैध धंदे बंद करण्याबाबत मागणी करण्यात आली आहे.
वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष वंदनाताई सोनवणे, जिल्हा महासचिव वंदनाताई आराक, रावेर तालुका अध्यक्ष बाळु शिरतुरे यांच्या नेतृत्वाखाली निंभोरा पोलीस स्टेशनचे ए.पी.आय हरिदास बोचरे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी, फैजपुर, पोलीस अधीक्षक, जळगाव, तसेच मुंबई मंत्रालयापर्यंत पाठविण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी रफिक बेग, शेख याकूब शेख नजीर, महिला आघाडी सायरा कोचुरे, महासचिव कांतीलाल गाढे, सलीम शहा यासीन शहा, कंदरसिंग बारेला, ज्ञानेश्वर तायडे, कैलास तायडे, पंकज तायडे, मनोहर तायडे, संजय कोचुरे, ललिता कोचुरे, आशा जाधव, पल्लवी कोळी, सुनिता पवार, शोभा बिराडे, गुंफाबाई वाघ, रेणुकाबाई भिल, सुरेखा आदीवाल आदी बहुसंख्य महिला, पुरुष व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.