गारपिटीमुळे शेतकरी हवालदिल
चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) : आज दुपारपासूनच रावेर तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने केळी बागांच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा धक्का बसला आहे. तालुक्याच्या उटखेडा, भाटखेडा तसेच मधल्या टप्प्यात गारांचा वर्षाव होऊन पावसाला सुरुवात झाली होती.
तापी नदीच्या किनार भागांत वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने गारांमुळे केळी पिकाचे नुकसान झाले आहे. त्याच प्रमाणे आदिवासी भागांतही पावसाने हजेरी दिली आहे.
तसेच पारशा नाला लगत रोडवर झाड कोसळल्याने दोन्ही बाजुंची वाहातुक ठप्प झाली होती. दरम्यान पावसामुळे तालुक्याच्या काही गावांना विजपुरवठा खंडीत झाला होता. उन्हाच्या तडाख्या नंतर पाऊस आल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
बेमोसमी वादळी पावसामुळे केळी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. दरम्यान या घटनेबाबत तहसिलदार बंडु कापसे यांनी प्रतिक्रिया देतांना सांगितले की, वादळ, पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे आढावा घेण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सर्व पंचनामे लवकरच होतील. दरम्यान या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.