पाच दुचाकी जप्त
रावेर (प्रतिनिधी) :- येथील रावेर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी गोपनीय माहितीवरून एका दुचाकीचोराला अटक करून त्याच्याकडून पाच विविध कंपन्यांच्या मोटरसायकली ताब्यात घेतल्या आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित आरोपी अजय वाघोरे (वय २७ रा.भोर रेल्वे स्टेशन, रावेर) याने एक फॅशन प्रो कंपनीची (एम एच १९ बी आर ५२६९ हि मोटर सायकल चोरून आणलेली आहे अशी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. त्याची चौकशी केली असता त्याच्या कडून सात हजार रुपये किमतीची सदरची मोटर सायकलसह दूसरी दुचाकी ३५ हजार रुपये किमतीची (एम एच २८ ए एक्स २५०५), तिसरी बिनाक्रमांकाची मोटर सायकल २२ हजार रुपये किमतीची, चौथी दुचाकी ३६ हजार रुपये किमतीची (एमएच १२ एमक्यु ५४६६), पाचवी दुचाकी २८ हजार रुपये किमतीची विना नंबरची अशा एकूण पाच मोटरसायकली रावेर पोलिस प्रशासनाने जप्त केल्या आहेत.
ही कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी,अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधिक्षक अन्नपूर्णा सिंग, वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रदिप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ ईश्वर चव्हाण पोना सुरेश मेढे, पोकॉ समाधान ठाकुर, सचिन घुगे, प्रमोद पाटील, विशाल, पाटील, महेश मोगरे, अमोल जाधव, सुकेश तडवी, विकार शेख यांच्या पथकाने केली आहे.