आरक्षण सोडत जाहिर
रावेर (प्रतिनिधी) : नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी १२ प्रभागातील २४ नगरसेवकांच्या जागासाठी बुधवारी नगरपालिका मंगल कार्यालयात आरक्षण काढण्यात आले. त्यापैकी १२ जागा महिलासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. उपजिल्हाधिकारी तथा भुसंपादन अधिकारी निवृत्ती गायकवाड -यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत हे आरक्षण सोडत काढण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर प्रभारी मुख्याधिकारी अविनाश गांगोडे उपस्थित होते. प्रभाग आरक्षणामुळे अनेकांच्या राजकीय प्रवेशाच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत. तर आरक्षणामुळे अनेकांच्या राजकीय स्वप्नांवर पाणी फेरले आहे. दरम्यान आज काढण्यात आलेल्या आरक्षणावर दि. १३ तारखेपर्यंत हरकती घेता येणार आहे. त्याचप्रमाणे पालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी दिली.
नगरपालिकेतील प्रभागाचे आरक्षण
प्रभाग १- अ )नागरिकांचा मागास प्रवर्ग ब )सर्वसाधारण महिला
प्रभाग २ -अ )नागरिकांचा मागास प्रवर्ग ब )सर्वसाधारण महिला
प्रभाग ३- अ )नागरिकांचा मागास प्रवर्ग ब )सर्वसाधारण महिला
प्रभाग ४ -अ )नागरिकांचा मागास प्रवर्ग(महिला),ब)सर्वसाधारण
प्रभाग ५ -अ )अनुसूचित जाती, ब ) सर्वसाधारण महिला
प्रभाग ६-अ )सर्वसाधारण महिला ब )सर्वसाधारण
प्रभाग ७ -अ )सर्वसाधारण महिला ब) सर्वसाधारण
प्रभाग ८-अ )नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) ब)सर्वसाधारण
प्रभाग ९-अ)सर्वसाधारण महिला ब)सर्वसाधारण
प्रभाग १०- अ )अनुसूचित जाती (महिला) ब)सर्वसाधारण
प्रभाग १२ -अ)अनुसूचित जमाती (महिला), ब)सर्वसाधारण
प्रभाग १२-अ )नागरिकांचा मागास प्रवर्ग(महिला) ब )सर्वसाधारण