जळगाव ( प्रतिनिधी ) – रावेर लोकसभा हा मतदार संघ अनेक वर्षापासून काँग्रेसचाच मतदार संघ राहिलेला आहे. याचे कारण कारण २२% मुस्लीम मतदार हे काँग्रेसला मत देत आले आहे. एक दोन अपवाद वगळता हा मतदार संघ नेहमीच काँग्रेसचा गढ असून मुस्लिम समाज काँग्रेसला मदत करत आले असल्याचे मो.मुनव्वर खान यांनी सांगितले.
कर्नाटकच्या निकालानंतर मुस्लिम समाजाने एकतेर्फे काँग्रेसला मत दिल्याने तिथे सरकार बनले. याकरीता आताही मुस्लिम समाज काँग्रेस पक्षालाच मतदान करेल. (२०१९ ची मोदी सरकार हे इव्हीएममुळे आली. जेवळे खासदार सेना भाजपा चे आले त्यांना आश्चर्य वाटले की, एवढे मत कसे मिळाले) या साठी रावेर लोक सभा काँग्रेसचीची व काँग्रेसलाच द्यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष मो मुनव्वर खान, जिल्हा अध्यक्ष अब्दुल हमीद शेख, जामनेर रफीक मौलाना, मलकापुर चे माजी नगर अध्यक्ष रशीद खा जमदार, अॅड मजीद कुरैशी, जिल्हा अध्यक्ष जावेद कुरैशी, रावेर अध्यक्ष सलीम शे., यावल तालुका अध्यक्ष ईकलास सैय्यद, चोपडा अडावदचे जहीर खान, मुक्ताईनगर सचिव यासीन खान, सै कौसर कलीम मेम्बर फैजपुर, जामनेर शहर अध्यक्ष मुसा पिजारी, भुसावल शहर अध्यक्ष सलीम गवळी आदिंनी मागणी केली आहे.