रावेर (प्रतिनिधी) : रावेर तालुका कृषी विभाग व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने निंभोरा येथील कृषी तंत्र विद्यालयात तालुक्यातील कृषी निविष्ठा धारकांची खरीप पूर्व हंगामाची बैठक संपन्न झाली. यावेळी तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके,पंचायत समिती कृषी अधिकारी एल ए पाटील,ऍग्रो डीलर्स असोसिएशनचे तालुकाध्यक्ष सुनिल कोंडे यांसह कृषी सहाय्यक भूषण पाटील आणि तालुकाभरातील विक्रेते बांधव उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीस पंचायत समितीचे कृषी अधिकारी एल. ए.पाटील यांनी प्रास्ताविकात स्टॉक रजिस्टर पूर्ण करून मासिक अहवाल पाठविणे, पॉस मशीनचा नियमित वापर करावा दरपत्रक, साठा,परवाना नोंदी आदी अद्ययावत करून बियाणे व खते यांचे नियोजन कृषी विभागाला कळवावे असे आवाहन केले.तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके यांनी रासायनिक खतांसोबत नैसर्गिक खतांचा वापर करावा,बांधावर खते उपलब्ध करावीत तसेच सिडबॉलचा वापर करून निसर्गाचे जतन करण्याबाबत आवाहन केले.
ऍग्रो डीलर्स तालुकाध्यक्ष सुनिल कोंडे यांनी आपल्या मनोगतात प्रशासनाने कापूस बियाणे मागणीप्रमाणे उपलब्ध करून दिल्यास तुटवडा जाणवणार नाही तसेच ऑनलाइन कीटक नाशके व खतांची ही तपासणी व्हावी तसेच युरियाला अतिरिक्त वाढीव भाडे येत असून युरिया विक्रीत अडचणी येत असून याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याबाबत सांगितले.शिवाय वाजवी भावात विक्रेत्यांनी व्यवसाय करण्याबाबत विनंती केली.या वेळी बैठकीस बाजार समिती संचालक गणेश महाजन,संघटना सचिव युवराज महाजन,राहुल पाटील,प्रदीप महाजन, जितेंद्र महाजन, सुनिल महाजन, योगेश पाटील, विजय भोगे, किरण महाजन यांसह तालुकाभरातून कृषी विक्रेते बांधव उपस्थित होते.