अहिरवाडी रस्त्यावर घटनेत तिघांवर गुन्हा दाखल
रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील पाडला बुद्रुक ते मौजे अहिरवाडी दरम्यान एका पिकअप वाहनावर रावेर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी शिताफिने कारवाई केली. यात वाहनावरील चालक व एक इसम हा अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. वाहनात १० गाई कत्तल करण्याचे उद्देशाने वाहतूक करीत असल्याचे दिसून आले. त्यानुसार रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस शिपाई श्रीकांत शिरीष चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार खबर मिळाल्यावरून रविवारी दि. ६ एप्रिल रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास मौजे पाडला बुद्रुक ते मौजे अहिरवाडी दरम्यान रस्त्यावर पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप वाहन (एमपी ०४ एफयु ६२१७) या वाहनाला अडविले.(केसीएन) त्यातील चालक व क्लिनर बाजूकडील अनोळखी इसम अशांना ताब्यात घेत असताना अंधाराचा फायदा घेऊन ते आजूबाजूच्या शेतात पळून गेले. सदर वाहनाची तपासणी केली असता त्यात १० गोवंश जातीच्या गाई निर्दयतेने दोरीने बांधून अवैधरीत्या वाहतूक करताना दिसून आल्या.
या वेळेला या १० गाई ताब्यात घेऊन खानापूर येथील चंद्रकलाबाई गोटीवाले, गोशाळा येथे औषधोपचार व संवर्धनासाठी दाखल करण्यात आले आहेत. या वेळेला एकूण ३ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गाई मध्यप्रदेश राज्यातून महाराष्ट्र राज्यात कत्तलीच्या उद्देशाने आणत असल्याची माहिती मिळाली आहे.(केसीएन)तसेच रायसिंग उर्फ भाया रामसिंग अजनारे (रा. लालमाती ता. रावेर), त्याचा चालक आकाश शांताराम आवले उर्फ बारेला व अनोळखी इसम अशा तिघांवर कत्तल करण्याच्या उद्देशाने १० गाई निर्दयतेने घेऊन जात असल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई हि पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि तुषार पाटील, प्रमोद पाटील, विशाल पाटील, महेश मोगरे, श्रीकांत चव्हाण, चालक संजीव मेढे यांनी केली आहे.