रावेर (प्रतिनिधी) : लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने “महसूल पंधरवडा-२०२४”साजरा करण्यात येत आहे. उद्देशाने खिर्डी ता.रावेर महसूल मंडळातील मौजे पुरी गोलवाडे येथे “ई पिक पाहणी बाबत प्रचार व प्रसिद्धी करून शिबीर घेण्यात आले. शेतकऱ्यांना मोबाईल द्वारे ई पिक नोंदणी करणेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
शासन निर्णयानुसार महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होवून त्यांना योग्य लाभ घेता यावा यासाठी विशेष मोहीमच तालुकाभरात राबविण्यात येत आहे.
या प्रसंगी मंडळ अधिकारी प्रविण नेहेते, तलाठी हेमंत जोशी, सरपंच स्वप्निल इंगळे, समाधान भालेराव, ग्रामसेवक, ग्रा.सदस्य व पुरी गोलवाडे गावातील असंख्य शेतकरी उपस्थित होते.