वन्यजीव सप्ताहनिमित्त विभागाचा उपक्रम
रावेर (प्रतिनिधी) : वन्यजीव सप्ताह निमित्ताने रावेर वन परिक्षेत्र कार्यालयामार्फत संपूर्ण सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या आदिवासी तांडे व पाड्यावर वन्यजीवांबद्दल जनजागृतीपर कार्यकम घेण्यात आले. यावल वनपरिक्षेत्राचे उपवन संरक्षक जमिर शेख, सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील, वनक्षेत्रपाल अजय बावणे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ अहीरवाडी मधील महसुल हद्दीतील अहिरवाडी गाव येथे कार्यक्रम झाला.
गजानन महाराज शिक्षक मंडळ संचालित माध्यमिक विद्यालय अहिरवाडी येथेही वन्यजिव सप्ताह निमित्त जनगृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. वन्यजीव सप्ताहनिमित्त आवश्यक माहिती देऊन जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. तसेच या विषयावर विद्यार्थ्यांसोबत प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेण्यात आला. विजेते विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यावेळी रावेरचे वनक्षेत्रपाल अजय बावणे, राजेंद्र सरदार वनपाल अहिरवाडी, अजय धोबी वनपाल सहस्त्रलिंग, रविंद सोनवणे वनपाल रावेर, सुपडु सपकाळे आगार रक्षक, रावेर , जगदिश जगदाळे वनरक्षक जुनोना, वनरक्षक आयेशा पिंजारी, सविता वाघ तसेच या विद्यालयाचे प्राचार्य के. एस. पाटील, तसेच संस्थेचे सभासद चौधरी व इतर शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.