रावेर (प्रतिनिधी ) ;- बैलगाडीवर जाणाऱ्या १० जणांवर वीज कोसळून ते १० जण जखमी झाल्याची घटना तालुक्यातील जीनसी येथे आज दुपारी घडली असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
९ रोजी राज्यासह जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती . आज रावेर तालुक्यातील जिनसी या आदिवासी बहुल खेड्याजवळ बैलगाडीवरून जाणाऱ्या १० जणांवर वीज कोसळून १० जण जखमी झाले.
जखमींची नावे अशी
बळीरामपवार (वय-२१), दिलीप पवार (वय-२१), अरविंद पवार (वय-१५), ईश्वर दल्लू पवार (वय-१५), कमलसिंग लक्ष्मण पवार (वय-२०), अनिल लक्ष्मण पवार (वय-२७), बिंदुबाईल लक्ष्मण पवार (वय-५०), साईराम मोरसिंग पवार (वय-३७), मलखान मोरसिंग पवार (वय-४५) आणि लक्ष्मण मोरसिंग पवार (वय-५५) रा. जिन्सी ता. रावेर हे हे एकाच कुटुंबातील व्यक्तींचा यात समावेश आहे.
जखमींना रावेर ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी भेट देऊन जखमींची विचारपुस केली. १० जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. एन.डी. महाजन यांनी माहिती दिली.