भडगाव तालुक्यातील घटना
भडगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील कजगाव येथून कनाशी येथे पायी जात असताना लोन पिराचे गावाजवळ दुचाकी वरून आलेल्या तिघांनी एकाला जबर मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल व रोकड लुटण्याची घटना 24 जुलै रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास घडले. या प्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला तीन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की कनाशी येथील रहिवासी सागर राजेंद्र भदाणे (वय- 26 ) हे व्यवसायाने चालक असून ते रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास 24 जुलै रोजी कजगाव येथून कनाशी गावाकडे रस्त्याने पायी जात असताना लोन पिराचे गावाजवळ अज्ञात तीन व्यक्तींनी दुचाकीवरून येऊन त्यांना मारहाण करून शिवीगाळ करीत त्यांच्या जवळील मोबाईल आणि बाराशे रुपये रोख लुटून नेले .याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सपोनी चंद्रसेन पालकर करीत आहे.