फैजपूर ( प्रतिनिधी ) – सावदा येथे चिनावल आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी बसस्थानकासमोर हायवेवर रास्तारोको करून निदर्शने केली . कोचूर रोझोदा खिरोदा चिनावलसह. पंचक्रोशीतील शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते .
चिनावल शिवरात प्रमोद भंगाले यांचे शेतात 10000 जमा करुन ठेवलेले केळीची खोडे आणि ठिबक सिंचन संचाची अज्ञात समाजकंटकांनी नासधूस केली त्यांचे 2 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे बळीराम आनंदा नेमाडे यांचेही आज घड कापण्यात आले
काही दिवसांपासून चिनावलसह परिसरात शेतमाल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे काही दिवसांपूर्वी चिनावलला एका शेतकर्याचे 1000 केळी घड कापून फेकून दिल्याची घटना घडली पुन्हा 500 घड कापून फेकून दिल्याची घटना घडली दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात यावी व शेतकरयांना न्याय मिळावा यासाठी हे आंदोलन करण्यात आले