
आगामी काळात जिल्ह्यातील प्रत्येक गावात पक्षाचे युवा संघटन मजबूत करणे, जिल्ह्यात पक्षाची बुथ यंत्रणा मजबूत करणे, गांव तिथे शाखा हा मानस असल्याचे नवनियुक्त युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी सांगीतले. आहे. जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आ.एकनाथराव खडसे, गुलाबराव देवकर, डॉ.सतीश पाटील, रोहिणीताई खडसे यांचेसह सर्व मान्यवर नेत्यांचे मी आभार मानतो.
उमेश पाटील सन २००८ पासून पक्षाचे सक्रीय पदाधिकारी आहेत. यापुर्वी त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये तालुका तसेच जिल्हास्तरावर सरचिटणीस, उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे. ते ममुराबाद येथील खंडेराव देवस्थानाचे विश्वस्त असून त्यांनी गावात वाचन चळवळीस चालना मिळावी म्हणून श्री मनुदेवी सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय सुरु केलेले आहे. ममुराबाद येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कृती समितीचे देखील ते अध्यक्ष आहेत.