जळगाव ( प्रतिनिधी) – महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील गांधी उद्यानात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांच्याहस्ते हार व पुष्पगुच्छ अर्पण करून अभिवादन करण्यात येत आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील यांनी महात्मा गांधी यांच्या जीवन कार्याला उजाळा दिला. याप्रसंगी माजी मंत्री तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटिल, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, प्रदेश चिटणीस एजाजभाई मलिक, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदनाताई चौधरी, योगेश देसले, वाल्मिक पाटिल, अशोक पाटील, सुनील माळी, अमोल कोल्हे, कल्पिता पाटील, दिलीप माहेश्वरी, मजहर पठाण, सुशील शिंदे, अकिल पटेल, रिजवान खाटिक, रहीम तडवी, राजू बाविस्कर, राहुल टोके यांच्यासह आदींची उपस्थिती होती.