जळगाव (प्रतिनिधी):- दरवर्षी *२८ फेब्रुवारी रोजी डॉ. सी. व्ही. रमण यांनी शोधलेल्या ‘रमण परिणाम’ स्मरणार्थ राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो.* वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे आणि नवोपक्रमांना प्रोत्साहन देणे हा या दिवसाचा उद्देश आहे. यावर्षाची संकल्पना – *“महिलांचा विज्ञानातील सहभाग : विकसित भारतासाठी प्रेरक शक्ती.”* असे आहे.

*गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा* करण्यात आला. *कार्यक्रमाची सुरुवात माननीय प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक* व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
डॉ. सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे महत्त्व स्पष्ट करणारी भाषणे दिली. *मार्गेश वाघ, यश धनगर, भैरवी कुरकुरे, राजश्री यादव, रिद्धी भिरूड, गौरव इंगळे आणि माहिन शेख यांनी आपले विचार मांडले.*
*प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना नवोपक्रम करण्याचे आवाहन* केले. त्यांनी यावर्षीच्या विषयाचा संदर्भ देत महिलांच्या विज्ञानातील योगदानाचे महत्त्व सांगितले. *कोविड काळातील लसीचा शोध हा शतकातील महत्त्वाचा वैज्ञानिक शोध असल्याचे त्यांनी नमूद केले.* भविष्यातील अन्नटंचाईसारख्या आव्हानांवर वैज्ञानिक दृष्टिकोनातून उपाय शोधण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
*कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथम वर्ष AI&DS शाखेतील आदेश जैस्वाल या विद्यार्थ्याने केले. कार्यक्रमाचे समन्वयक ग्रंथपाल प्रा. नाकुल गाडगे यांनी केले.* सर्व विभागांतील प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला.
सदरील कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल *गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील सर, डॉ.वर्षा पाटील मॅडम (सचिव), डॉ. केतकी पाटील मॅडम (सदस्य), डॉ. वैभव पाटील सर (डीएम कार्डिओलॉजिस्ट) व डॉ. अनिकेत पाटील सर यांनी कौतुक केले.*









