जळगाव (प्रतिनिधी) :- येथील गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग मध्ये राष्ट्रीय स्तरावरील रायटींग फॉर रिसर्च ग्रांट वेबिनार नुकतेच संपन्न झाले.
गुगल मिटवर संपन्न झालेल्या या वेबिनार मध्ये सेंट फ्राँन्सीस कॉलेज ऑफ नर्सिंग इन्दोरच्या उपप्राचार्य डॉ डॉरविन दास या प्रमुख वक्त्या होत्या. त्यांचेसोबत गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या डॉ प्रियदर्शीनी मुन देखिल सहभागी होत्या.या वेबिनार मध्ये संपुर्ण भारतातून एकुण २०६ प्रतिनीधींनी सहभाग नोंदवला.
मार्गदर्शन करतांना प्रमुख वक्त्यांनी अनुदान लेखन कौशल्ये तयार करणे तुम्हाला निधी सुरक्षित करण्यात मदत करू शकते. लोकप्रिय मागणीनुसार अद्यतनित: अर्ज प्रक्रियेत प्रभुत्व कसे मिळवायचे आणि तुमचे अनुदान वेगळे कसे बनवायचे. यावर मार्गदर्शन करतांना भरपूर वेळ द्या,तुमचा फंडर आणि योजना काळजीपूर्वक निवडा,अनेक स्त्रोतांकडून सुरुवातीच्या टप्प्यावर सल्ला मिळवा,योग्य भागीदार मिळवा,तुमच्या प्रेक्षकांचा विचार करा,संशोधनाच्या प्रभावाचा विचार करा,संबंधित प्राथमिक डेटा समाविष्ट करा,एक आकर्षक कथा सांगालक्ष केंद्रित करा. आपल्या पद्धतींचे समर्थन करा,जोखीम कमी करा,तुमच्या प्रस्तावाचे अंतर्गत पुनरावलोकन करा,अंतिम तपासणी करा या १२ पध्दतीचा अवलंब करून परिपुर्ण संशोधन प्रस्ताव तयार करता येतो असे सागितले. डॉ. मुन यांनी प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्याचा परिचय करून दिला. समन्वयक प्रा हिमांगी मुरकुटे यांचाही सहभाग होता.