जैन इरिगेशनसह गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम
जळगाव ( प्रतिनिधी ) – हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र याभियांनांतर्गत वृक्ष लागवड करून (एक पेड माँ के नाम) वन संवर्धन दिन साजरा करण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ येथे रस्त्याच्या दुतर्फा राष्ट्रीय महामार्ग विभाग धुळे व गांधी रिसर्च फाऊंडेशन जळगाव याच्या संयुक्त विद्यमाने आणि जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड यांच्या सहकार्याने रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली.
डॉ. सुभाष चौधरी यांच्या शेतापासून ते अनुभूती शाळेपर्यंत स्थानिक करंज, कांचन, बेहडा, चिंच,जांभूळ, शिरस इत्यादी प्रजातीच्या १२१ रोपांची लागवड करण्यात आली. या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे जैन हिल्स सुरक्षा विभागाचे सहकारी आनंद बलोधी, जळगाव वन विभागाचे क्षेत्रीय अधिकारी रोहिणी थोरात यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. गांधी रिसर्च फाऊंडेशन चे फिल्ड ऑफिसर विक्रम अस्वार, जैन इरिगेशन सिस्टीम लि. चे वन व पर्यावरण विभागाचे राजेंद्र राणे वन व पर्यावरण सल्लागार व इतर सहकारी उपस्थित होते.