• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

जळगावात शनिवारपासून राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 29, 2025
in जैन कंपनी, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, नवी दिल्ली, भारत, महाराष्ट्र, मुंबई, विश्व
0
जळगावात शनिवारपासून राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

स्पर्धेत विविध राज्यांतील फिडे मानांकन प्राप्त ४०० खेळाडूंचा समावेश

जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांची पत्रपरिषदेत माहिती

जळगाव (प्रतिनिधी) :- येथे ३८व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन २ ते ८ ऑगस्ट २०२५ दरम्यान जळगाव येथील जैन हिल्स परिसरातील आकाश ग्राऊंडमध्ये केले जाणार आहे. बाल चमूंचा हा बुद्धिबळ महासंग्राम जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने व अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ यांच्या मार्गदर्शनात होत आहे, अशी माहिती जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष अतुल जैन यांनी याप्रसंगी मांडले.

जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेड या आंतरराष्ट्रीय कंपनीने ही स्पर्धा प्रायोजित केली आहे. या राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेला खेळाडूंचा उत्स्फूर्त व उदंड प्रतिसाद मिळाला असून देशभरातून ५०० पेक्षा अधिक खेळाडूंनी या अजिंक्यपद स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला आहे. विशेष उल्लेखनीय बाब अशी की, यातील फिडे मानांकन प्राप्त ४०० खेळाडूंचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यातील निसर्गरम्य जैन हिल्स परिसरातील अनुभूती या भव्य दिव्य मंडपात ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. बुद्धिबळ अजिंक्य स्पर्धेत एकूण ११ फेऱ्या होणार असून आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने आखलेल्या नियमावलीनुसार ही स्पर्धा पार पडेल. या स्पर्धेत कोलकता येथील आंतरराष्ट्रीय पंच देवाशीष बरूवा हे मुख्य पंचांची भूमिका निभवतील. तर जळगावचे आंतरराष्ट्रीय पंच प्रवीण ठाकरे हे सहाय्यक पंच असून गुजरातचे प्रशांत रावल यांच्यासह अन्य १४ पंच हे या स्पर्धेचे संचलन करतील. ही बुद्धीबळ स्पर्धा मुली व मुले अशा स्वतंत्र वयोगटात आयोजित केली आहे.

या स्पर्धेत प्रत्येक डावासाठी बुद्धिबळ घड्याळांचा वापर अनिवार्य असून प्रत्येकी ९० मिनिटे व प्रत्येक चाली साठी ३० सेकंदाची वाढीव वेळ निर्धारित करण्यात आली आहे. बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेसाठी एकूण ८ लाखांची रोख पारितोषिके तसेच चषक दिले जाणार आहे. सदरील स्पर्धा जरी ११ वर्षा आतील वयोगटातील मानांकन स्पर्धा असली तरी स्पर्धेतील विजेते खेळाडू आशियाई व जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरतात अशा स्पर्धांमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग पाहता नवोदित खेळाडूंना देखील आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त करण्याची संधी मिळते. या स्पर्धेत अंदमान निकोबार, आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, चंदिगड, छत्तीसगड, दिल्ली, गोवा, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, पंजाब, राजस्थान, अशा विविध राज्यातील खेळाडूंशी आपला खेळ आजमावण्याची संधी यातून मिळेल. तसेच या राष्ट्रीय स्पर्धेद्वारा आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त करण्याची संधीसुद्धा या स्पर्धकांना मिळणार आहे.

या स्पर्धेच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील ७, ९ व ११ वर्षातील वयोगटातील तसेच स्थानिक गुणवान खेळाडूंना मानांकन प्राप्त करण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेची उल्लेखनीय बाब म्हणजे ५५० नोंदणीकृत खेळाडूंमध्ये जवळपास ४०० खेळाडूंना फिडे मानांकन प्राप्त आहे त्यात प्रथम मानांकित पुण्याचा अद्विक अग्रवाल(२२५१), मुलींमध्ये केरळची देवी बीजेस (१८६९) यांच्यासह अनेक खेळाडू हे आशियाई व जागतिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेले खेळाडू असून या स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे पहिले प्रत्येकी सर्वोच्च सहा सामने डिजिटल बोर्डवर लाईव्ह खेळले जातील तसेच चेसबेस द्वारे स्पर्धेचे सामने आपणास त्यांच्या ॲपद्वारे लाईव्ह पाहण्यास मिळणार आहेत. या स्पर्धेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे सर्व सहभागी खेळाडूंना त्यांच्या प्रत्येक डावातील निकालानुसार विजयी उपविजय व बरोबरीत असलेल्या खेळाडूंना विशेष मूल्यांकनानुसार रोख रकमेचे पारितोषिक जैन इरिगेशन सिस्टम लिमिटेड तर्फे दिले जाणार आहे.

सदर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे सल्लागार व जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड चे चेअरमन अशोक जैन यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभत आहे. तसेच महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेचे व जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष फारुख शेख, उपाध्यक्षा अंजली कुलकर्णी, जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव नंदलाल गादीया, खजिनदार अरविंद देशपांडे, सहसचिव शकील देशपांडे व संजय पाटील सदस्य चंद्रशेखर देशमुख, तेजस तायडे, पद्माकर करणकर, नरेंद्र पाटील, रवींद्र धर्माधिकारी, प्रवीण ठाकरे, रवींद्र दशपुत्रे, डॉ. तुषार उपाध्ये व सल्लागार सदस्य आर. के. पाटील, विवेक दाणी, यशवंत देसले तसेच जैन स्पोर्ट्स अकॅडमी व जैन इरिगेशन सिस्टिम्स कंपनीचे सर्व सहकारी यांचे सहकार्य लाभत आहे.


 

 

Tags: #jalgaon jain company news #maharashtraजळगावात शनिवारपासून राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन
Previous Post

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे वकिली पोशाखात कोर्टात हजर

Next Post

गवत चरताना उघड्या विजेच्या तारांना स्पर्श होऊन २ म्हशी शॉक लागून जागीच ठार !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गवत चरताना उघड्या विजेच्या तारांना स्पर्श होऊन २ म्हशी शॉक लागून जागीच ठार !

गवत चरताना उघड्या विजेच्या तारांना स्पर्श होऊन २ म्हशी शॉक लागून जागीच ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुचाकीचोराच्या बऱ्हाणपूर येथून आवळल्या मुसक्या, सव्वा दोन लाखांची ३ वाहने जप्त
1xbet russia

दुचाकीचोराच्या बऱ्हाणपूर येथून आवळल्या मुसक्या, सव्वा दोन लाखांची ३ वाहने जप्त

September 17, 2025
रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, नातेवाईकांचा रुग्णालयात आक्रोश
1xbet russia

रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, नातेवाईकांचा रुग्णालयात आक्रोश

September 17, 2025
राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्राचे वर्चस्व अनुभूती स्कूलच्या विद्यार्थीनींची चमकदार कामगिरी
जैन कंपनी

राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्राचे वर्चस्व अनुभूती स्कूलच्या विद्यार्थीनींची चमकदार कामगिरी

September 17, 2025
शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
1xbet russia

शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

September 17, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दुचाकीचोराच्या बऱ्हाणपूर येथून आवळल्या मुसक्या, सव्वा दोन लाखांची ३ वाहने जप्त

दुचाकीचोराच्या बऱ्हाणपूर येथून आवळल्या मुसक्या, सव्वा दोन लाखांची ३ वाहने जप्त

September 17, 2025
रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, नातेवाईकांचा रुग्णालयात आक्रोश

रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, नातेवाईकांचा रुग्णालयात आक्रोश

September 17, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon