जळगाव ( प्रतिनिधी ) – उत्तरप्रदेशातील लखीमपूर येथील शेतकरी हत्याकांडाचा निषेध करीत आज दोषींवर कठोर कारवाईची मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की , उत्तरप्रदेशातील लखीमपूर येथे केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मोटारींच्या ताफ्याने काल आंदोलक शेतकऱ्यांना चिरडले आहे या हत्याकांडातील दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे या हत्याकांडाचा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र निषेध करीत आहे.
या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील , जिल्हा उपाध्यक्ष वाल्मिक पाटील , माजी राज्य मंत्री गुलाबराव देवकर , अशोक लाडवंजारी , महिला आघाडी शहराध्यक्षा मंगलाताई पाटील , महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी , जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील , शिवराम पाटील , अरविंद मतकरी आदींच्या सह्या आहेत.







