मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते दिली नियुक्तीपत्र
जळगाव (प्रतिनिधी) : – येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या विविध निवडी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत. जळगाव महानगरची नवीन कार्यकारिणी यात जाहीर झाली आहे. मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते नवीन निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत.
नवीन निवडीत फिरोज शेख यांची विधानसभा क्षेत्र प्रमुखपदी, ऍड. कुणाल पवार यांची जळगाव महानगर महासचिवपदी तुषार इंगळे, पंकज बोरोले यांची महानगर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यासह विविध उपाध्यक्ष, महासचिव यांची निवड झाली आहे.