जळगाव ( प्रतिनिधी ) – संविधान गौरव दिनानिमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जळगावातील कार्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, मीनाक्षी चव्हाण, वाय एस महाजन , दिलिप माहेश्वरी, सलीम इनामदार, अन्वर खाटीक, अनिरुध्द जाधव, सुशील शिंदे, किरण राजपूत, प्रकाश पाटील, राहुल टोके, अकील पटेल व मान्यवर उपस्थित होते.