जळगाव (प्रतिनिधी ) ;- जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तालुका स्तरावरून आलेली मदत आज कोकण पूरग्रस्तांसाठी रवाना करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष ॲड. भैयासाहेब रविंद्र पाटील यांनी संपूर्ण साहित्य कोकण वासियांपर्यंत पोहचवून देण्यासाठी वाहन उपलब्ध करून दिले. रविंद्र पाटील यांनी गाडीला झेंडा दाखवत गाडी कोकणसाठी रवाना केली. याप्रसंगी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार गुरुमुख जगवाणी, माजी आमदार दिलीप तात्या सोनवणे, सोपान पाटील, अशोक लाडवंजारी, कार्याध्यक्ष विलास पाटील, युवक जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, महिला जिल्हाध्यक्षा वंदनाताई चौधरी, कल्पनाताई पाटील,उमेश नेमाडे, युवती जिल्हाध्यक्षा कल्पिताताई पाटील, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष रोहन सोनवणे , सौ.अर्चनाताई कदम, एजाजभाई मलिक, सलीमभाई इनामदार वाल्मीक मामा पाटील, राजेश पाटील, परेश कोल्हे, राजेंद्र पाटील, रविदादा पाटील, राहुल जोशी, गणेश निंबाळकर, अशोक पाटील, सुनीलभाऊ माळी, ज्ञानेश्वर पवार, चंदू चौधरी, सबिन पाटील, अनिरुद्ध जाधव, विनोद सुर्यवंशी, सौ.उज्वलाताई, जुबेदा शाह.,शिंदे राजू बाविस्कर, अनिल पवार व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.