जळगाव (प्रतिनिधी) : राणीदानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता १२ वीचा निकाल ९८.१४ टक्के लागला आहे. विद्यालयातून शिवानी ज्ञानेश्वर उबाळे आणि श्रद्धा सदाशिव पाटील या दोन्ही विद्यार्थिनींना ७९.६७ टक्के गुण मिळाले, त्या दोन्ही विद्यार्थीनी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. ऐश्वर्या राजू पाटील हिने ७८.३३ टक्के गुण मिळवून विद्यालयातून द्वितीय तर राठोड अजय लक्ष्मण या विद्यार्थ्याने ७३.३३ टक्के गुण मिळवून विद्यालयातून तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे.
विद्यालयाने आपल्या यशाची परंपरा यावर्षी सुद्धा कायम राखली आहे. संस्थेचे चेअरमन संजय गरुड, संस्थेचे व्हाईस चेअरमन भीमराव शेळके, सचिव सागरमल जैन, सहसचिव यु यु पाटील, कार्यालयीन सचिव दीपक गरुड, सर्व संचालक मंडळ, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन, जैन फॉर्म वाकोदचे व्यवस्थापक विनोदसिंह राजपूत, स्थानिक सल्लागार समितीचे चेअरमन पांडुरंग पाटील व समिती सदस्य, वाकोद गावचे पोलीस पाटील संतोष देठे, विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. टी. चिंचोले, पर्यवेक्षक एन. टी. पाटील विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर-वृंद व पंचक्रोशीतील पालकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.