पारोळा ( प्रतिनिधी ) – येथील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयाच्या तीन प्रयोगशाळाना विद्यापीठाचे संशोधन केंद्र म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्याकडून मान्यता मिळाली आहे
राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयाच्या पदार्थ विज्ञान आणि रसायनशास्त्र संशोधन केंद्र शैक्षणिक वर्ष 2011 पासून विद्यापीठाच्या मान्यतेने सुरू आहेत या विभागांना आता पुनः संशोधन केंद्र म्हणून मान्यता मिळाली आहे गणित संशोधन केंद्र म्हणूनही आता प्रथमच मान्यता मिळाली आहे आतापर्यंत पदार्थ विज्ञान संशोधन केंद्रातून पाच विद्यार्थी प्राध्यापक व रसायनशास्त्र केंद्रातून तीन विद्यार्थी प्राध्यापक पी एच डी उत्तीर्ण झाले आहेत . पदार्थ विज्ञान, रसायन शास्त्र आणि गणित विभागात प्रत्येकी चार असे बारा विद्यार्थ्यांचे संशोधन सध्या सुरू आहे इतर मोठ्या महाविद्यालयाचे विद्यार्थी व प्राध्यापक, आणि विद्यार्थ्यांना संशोधनाची संधी मिळाली आहे
वरिष्ठ महाविद्यालयातील 26 पैकी 16 प्राध्यापक पी एच डी पदवी प्राप्त आहेत, 4 प्राध्यापक एम फील पदवी प्राप्त आहेत या महाविद्यालयाच्या संशोधन केंद्रांचे 200 च्यावर शोधनिबंध जागतिक पातळीवरील जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत प्राध्यापक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी होतात हे प्राध्यापक पी एच डी परीक्षांसाठी इतर विद्यापीठात परीक्षक म्हणून काम करीत आहेत
या संशोधनकार्याचे श्रेय महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष वसंतराव मोरे यांना आहे . लवकरच वनस्पतीशास्त्र संशोधन प्रयोगशाळा आणि इतर अध्यासन केंद्र सुरु करण्याचा महाविद्यालयाचा मानस आहे.