पारोळा तालुक्यातील उंदीरखेडे येथील घटना
पारोळा ( प्रतिनिधी ) :- तालुक्यातील उंदिरखेडे येथे एका २५ वर्षीय तरूणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना २३ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घटना घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सचिन गणेश चांदवडे (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, २३ रोजी सचिन चांदवडे याने आपल्या राहत्या घराच्या वरील मजल्यावर असलेल्या रूममध्ये पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. त्यानंतर त्यास लगेच खाली उतरून खासगी रूग्णालयात दाखल केले. परंतु, प्रकृती खालावल्याने त्यानंतर तेथून सचिन चांदवडे यांना धुळे येथे हलवण्यात आले. परंतु, २४ रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान सचिनचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सचिन हा सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. तर तो पुणे येथील आयटी पार्कमध्ये नोकरीस होता. तसेच सचिन चांदवडे याला अभिनयाची लहानपणापासूनच आवड असल्याने तो मुंबई, पुणे येथील सिनेमासृष्टीत त्यांनी अभिनयाचे काम केलेले आहे. दरम्यान, सचिन चांदवडे यांच्या अकस्मात जाण्याने तालुक्यात सर्वत्र शोककळा पसरली आहे. याबाबत, पारोळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









