मुंबई (वृत्तसंस्था ) -शिवसेनेने आपल्या जागा पाडून पाठीत खंजीर खुपसला. राजकारणामध्ये धोका सहन करू नका. जे राजकारणात धोका देत असतात त्यांचं राजकारण यशस्वी होत नसतं. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे’ असे म्हणत भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर आहे. भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
ही बैठक मुंबई महानगर पालिका संदर्भात होती. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा सहभाग होता. यावेळी अमित शहा यांनी भाजपच्या नेत्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी अमित शहा यांनी भाषण करत असताना उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.